सांगते आज तुम्हाला त्या दिवशी काय झाले ?
वाटले जाऊ कुठे तरी आणि तयार व्हायला गेले
छान ड्रेस घातले
आणि निघाले जायला
शृंगार पाहून स्वतःचा
उगाच मनात लाजले
मग भानावर आले
चला निघाचंय आता असं म्हणत
घराबाहेर पडले
बघता बघता खूप लांब निघून आले होते
कुठे आले का आले माहित नाही
पाहिले आजूबाजूला
शांतता होती सर्वत्र
बसले थोडा वेळ निवांत तिथे
अचानक कोणीतरी हाक मारली
आवाज ओळखीचा वाटला
मी नजर वर केली आणि पाहिले
तो माझा सखा होता
खूप दिवसांनी भेटला होता
मला खूप बरं वाटलं त्याला बघून
सुरुवातीला औपचारिकता करत होतो
पण हळूहळू खूप बोलायला लागलो
वेळेचे भानच राहिलं नव्हतं दोघांना
आयुष्यात घडलेल्या घडामोडी
हसत रडत एकमेकांना सांगत बसलो
मग मात्र निरोप घ्यायची वेळ झाली
एक निखळ हास्याने निरोप दिला त्याला
मग मी ही निघाले घरी गेले
अचानक दुसऱ्या दिवशी
आजूबाजूची लोक जमली
मग ती ओरडू लागली
अपशब्द वापरू लागले
काय केलंय मी
विचारणा केली त्यांना
आणि त्यांचं उत्तर ऐकून
पायाखालची जमीनच सरकली
तू अपवित्र झालीस
का म्हणून
त्या मुस्लिम मुलासोबत
कशी काय बोल्लीस
काफिर म्हणतात आपल्याला ते माहित नाही का तुला
लहान आहेस तू
फसवेल तो तुला
फायदा घेईल तुझा
बस्स झालं, मी जोरात ओरडले
कोणाला भेटायचं मी
प्रश्न माझा आहे
जात धर्म पाहत नाही मी
माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा आहे
नका बांधू नात्यांना
नीतीमत्तेच्या बंधनात
मैत्री आणि प्रेम करुन बघाना आधी
कसलेही सामाजिक ठप्पे न लावता
आणि मग करा निवड
कोण पवित्र आहे आणि कोण अपवित्र ?
~ श्रद्धा माटल