एक स्वतंत्र पक्षी मी
उंच उडत राहणार आहे
एक स्वतंत्र ज्योत मी
लख्ख प्रकाशित करणार आहे
एक स्वतंत्र श्वास मी
शेवटपर्यंत घेणार आहे
एक स्वतंत्र ध्यास मी
कायम मनी जपणार आहे
एक स्वतंत्र सूर्य मी
उषःकाल करणार आहे
एक स्वतंत्र चंद्र मी
चांदणे शिपंत जाणार आहे
एक स्वतंत्र मशाल मी
क्रांतिला प्रज्वलित करणार आहे
एक स्वतंत्र वारा मी
सळसळत वाहणार आहे
एक स्वतंत्र व्यक्ती मी
हक्कांसाठी लढणार आहे
एक स्वतंत्र विचार मी
बंधातून मुक्त होणार आहे
एक स्वतंत्र प्रेम मी
न डगमगता जपणार आहे
एक स्वतंत्र समाज मी
माझ्यापासून करणार आहे
~ श्रद्धा माटल